
सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील सोमठाणे येथे बिबट्याच्या हल्ल्यात १७ वर्षीय युवक जखमी झाला. त्याच्या डोक्यावर व छातीवर जखमा झाल्या असून, उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
सोमठाणे येथे राहणारा युवक कृष्णा सोमनाथ गिते हा सकाळी ६.३० च्या सुमारास रस्त्याने जात असताना शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. त्यावेळी कृष्णाने आरडाओरडा केला आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिक धावत आले. त्यामुळे कृष्णाला सोडून बिबट्याने धूम ठोकली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव व कर्मचार्यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली, तसेच कृष्णा गिते याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी पाठविण्यात आले. या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून, वनपरिक्षेत्राधिकारी मनीषा जाधव यांनी तत्काळ पिंजरा लावणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा :
- कोल्हापूर : कंपवाताच्या विकारावर शेपू गुणकारी : शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे महत्वपूर्ण संशोधन
- सांगली : जिल्ह्यात अनेक लॅबोरेटरिज् अनधिकृत
- Monsoon 2023 : हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 412 मिमी पावसाची नोंद
The post नाशिक : सिन्नरला भरदिवसा युवकावर बिबट्याचा हल्ला appeared first on पुढारी.