नाशिक: सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर

सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा 

सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता माजी आमदार राजाभाऊ वाजे- युवा नेते उदय सांगळे यांच्या गटाकडे गेली आहे. त्यामुळे बाजार समिती निवडणूकीच्या पडघमानंतर येथील बाजार समितीत सत्तेच्या चाव्यांचे हक्कदार बदलल्याचे चित्र दिसून येत आहे.

सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर झाले असून डॉ. रविंद्र पवार सभापती तर सिंधुताई कोकाटे उपसभापती पदावर विराजमान झाल्या आहेत. त्याचप्रमाणे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटातील सिंधू कोकाटे वाजे – सांगळे गटाला मिळाल्याने त्यांना उपसभापतीपदाची लॉटरीच लागली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक: सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर appeared first on पुढारी.