नाशिक : सुट्ट्यांची पर्वणी साधत ठक्कर स्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले

बस गर्दी www.pudhari.news

नाशिक  : पुढारी ऑनलाइन डेस्क

कोरोनानंतर दीर्घ कालावधीनंतर माहेरला जाण्याची ओढ आणि त्यात भाऊबीज व पाडव्यानिमित्त प्रत्येक महिलांची असलेली गावी जाण्याची उत्सुकता बसस्थानक तसेच रेल्वे स्थानकावर असलेल्या गर्दीवरुन दिसून येत आहे.

दिवाळीसण म्हटलं की, आप्तस्वयकीयांना भेटण्याची त्यांच्या ख्याली खुशी विचारण्याची चाहूल लागलेली असते. दिवाळसण आणि सुट्ट्यांची पर्वणी साधून हा मेळा साधण्यासाठी श्रमिकवर्गही गावी जाण्यासाठी सुट्टी आणि वेळेचे नियोजन करत महागाईच्या रहाडगाड्यात मिळालेला जो काही तुटपुंजा बोनस असेल त्याची आर्थिक तजबीज करुन आनंदाने गावी पावले वळाली आहेत. या प्रवाशांना त्यांच्या गावी सुखरुप पोहचविण्यासाठी लालपरी ही सज्ज झाली असून राज्य परिवहन महामंडळाने दिवाळसणाच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्यांचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार दूर अंतरावरच्या जादा प्रवाशी गाड्यांचे नियोजन आखण्यात आले आहे.

महागाईमुळे खासगी प्रवाशी गाड्या परवडेना.. म्हणून काहींना आपल्या लालपरीलाच पसंती दिली असून त्यासाठी नाशिक ठक्कर बाजार येथे प्रवाशांची गावी जाण्यासाठी झुंबड उडाली आहे. येथील बसस्थानक गर्दीने फुलून गेले आहे. त्यासाठी पोलीसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला असून गर्दीचा विचार करता भाऊबीज, पाडवा या दिवाळसणानिमित्त काही मौल्यवान वस्तू प्रवाशी भेट देण्यासाठी स्वत:जवळ बाळगत असल्याने प्रवाशांना आपल्या मौल्यवान वस्तूंची निगराणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सुट्ट्यांची पर्वणी साधत ठक्कर स्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले appeared first on पुढारी.