नाशिक : सुधाकर बडगुजर म्युनिसिपल कामगार सेनेचे नवे ‘अध्यक्ष’

सुधाकर बडगुजर

नाशिक, सातपूर : पुढारी वृत्तसेवा 

शिवसेना प्रणित म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने या पदाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या म्युनिसिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदी आता शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

प्रविण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरही मीच मम्युनिसिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदी कायम असल्याचा दावा केला होता, मात्र हा दावा शिवसेनेचे उपनेते बबन घोलप यांनी फेटाळून लावत तिदमे यांच्या जागी आता नाशिक शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाची घोषणा शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात बबन घोलप यांनी केली आहे. शिंदे गटात जाणाऱ्या संभाव्य नाराज नगरसेवकांच्या मनधरणीसाठी शिवसेनेच्या वतीने सातपूर येथे पदाधिकारी मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्याला उपनेते बबन घोलप, सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, माजी गटनेते विलास शिंदे, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठचा संख्येने उपस्थित होते.

मनपा कर्मचाऱ्यांना देणार न्याय

या अध्यक्ष पदाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी, त्यांना उद्भवणाऱ्या समस्या, त्यांचे प्रश्न परखडपणे सभागृहात मांडू असा आशावाद म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : सुधाकर बडगुजर म्युनिसिपल कामगार सेनेचे नवे 'अध्यक्ष' appeared first on पुढारी.