नाशिक : सुफी धर्मगुरूच्या खुनातील 3 संशयित राहुरीतून जेरबंद

जरीफ बाबा

नाशिक (राहुरी) : पुढारी वृत्तसेवा
संपूर्ण राज्यात चर्चेचे ठरलेल्या अफगाणी सुफी मुस्लीम धर्मगुरू ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती यांच्या हत्याकांडातील तीन आरोपींना राहुरी पोलिसांनी शिताफीने पकडून जेरबंद केले आहे. संतोष हरिभाऊ ब्राह्मणे (वय 27, रा. समतानगर, कोपरगाव), गोपाल लिंबा बोरगुले (वय 26, रा चवडी जळगाव ता. मालेगाव) व विशाल सदानंद पिंगळे (वय 23, रा. कोपरगाव) अशी पकडलेल्या आरोपींची नाव आहेत.

नाशिक जिल्ह्यातील येवला परिसरात हे हत्याकांड घडले होते. डोक्यात गोळी घालत त्यांची हत्या करण्यात आली होती. अफगाण येथील रहिवासी असलेले सुफी मुस्लीम धर्मगुरू ख्वाजा चिश्ती यांनी नाशिक परिसरामध्ये अनेक वर्षांपासून धार्मिक व सामाजिक कार्यातून हजारो लोकांशी आपुलकीने संबंध निर्माण केले होते. त्यांनी नाशिक परिसरासह राज्यात अनेक ठिकाणी प्रॉपर्टी निर्माण केली होती. कोट्यवधी रूपयांची प्रॉपर्टी व हजारो मानणारा वर्ग या वादातूनच मुस्लिम धर्मगुरूची हत्या झाल्याची चर्चा राज्यात झाली. या घटनेतील आरोपींना पकडणे हे राज्य स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नाशिक स्थानिक गुन्हे शाखेसमोर होते.

दरम्यान, त्यांना हवे असलेले या हत्याकांडातील आरोपी राहुरी पोलिसांकडून बुधवारी (दि.3) रात्री 10 वाजता पकडण्यात आले. राहुरी पोलिसांच्या सतर्कतेने राज्य पोलिस प्रशासनाला हवे असलेले आरोपी सापडल्याने घटनेचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. राहुरी हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा पकडल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सज्जन नर्‍हेडा हे घराकडे निघाले असताना, त्यांना गुप्त खबर्‍यामार्फत माहिती मिळाली होती.

हेही वाचा :

The post नाशिक : सुफी धर्मगुरूच्या खुनातील 3 संशयित राहुरीतून जेरबंद appeared first on पुढारी.