सुरगाणा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने गुजरातला जोडणाऱ्या सुरगाणा – वासदा या महामार्गावर उंबरठाण जवळील वांगण बारीत आज (दि. २८) पहाटे दरड कोसळली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
जवळपास महिनाभरापासून सुरगाणा शहरासह तालुक्यात पाऊस सुरू आहे. पावसामुळे एकीकडे शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे काही प्रमाणात जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसामुळे रस्ते खराब झाले आहेत. उंबरठाण परिसरात देखील पावसाचे सातत्य कायम असल्याने येथून दोन तीन किलोमीटर अंतरावरील वांगण बारीत आज पहाटे दरड कोसळून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. रस्त्यावर झाडे देखील पडली होती. गुजरातला जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने दोन्ही बाजू कडील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
दरड कोसळल्याची माहिती बांधकाम विभागाला मिळताच अधिकारी जगदीश वाघ, हर्षल पाटील व कर्मचारी यांनी तत्काळ याठिकाणी येऊन जेसीबीच्या सहाय्याने बारीतील मलबा दोन अडीच तासात बाजूला करून वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.
हेही वाचा
- नाशिक : रुणमळीत दोन गटात हाणामारी; पोलिसांच्या वाहनावर संतप्त जमावाचा हल्ला
- पुणे- नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा ; बंद पडलेल्या कंटेनरवर दोन टेम्पो आदळले
- नाशिक क्राईम : पादचारी वृद्धेची सोनसाखळी ओरबाडली
The post नाशिक: सुरगाणा-वासदा मार्गावरील उंबरठाणजवळ दरड कोसळली appeared first on पुढारी.