नाशिक : सुवर्ण मुखवटा शृंगार पूजेनिमित्त त्र्यंबकला भाविकांची गर्दी

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग,www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
पाडव्याच्या निमित्ताने दररोज सायंकाळी होत असलेल्या प्रदोष पुष्प पूजेत भगवान त्र्यंबक राजास पोशाख करण्यात येऊन त्यावर पंचमुखी सुवर्ण मुखवटा ठेवण्यात आला होता. त्याच्या दर्शनासाठी दिवाळी पाडव्यापासून त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी उसळली आहे.

संपूर्ण वर्षभरात केवळ दोन वेळेस ज्योतिर्लिंग त्र्यंबक राजाच्या पिंडीवर सुवर्ण मुखवटा ठेवण्यात येतो. त्याच वेळेस दररोज पिंडीवर ठेवण्यात येणारा चांदीचा मुखवटा हर्ष महाल अथवा आरसे महालात ठेवण्यात आला. यावेळी प्रदोष पुष्प पूजक उल्हास आराधी, रंगनाथ आराधी, डॉ. ओमकार आराधी यांच्यासोबत पुजारी प्रदीप तुंगार, राज तुंगार यांनी आरती केली. वर्षभरात केवळ गुढीपाडवा आणि दिवाळी पाडवा या दोन वेळेस होणारा हा सोहळा होतो. यावेळेस विश्वस्त भूषण अडसरे, प्रशांत गायधनी, संतोष कदम यांसह नगरसेविका व गटनेत्या मंगला आराधी आदी उपस्थित होते. भाविकांनी या सोनेरी क्षणाचे साक्षीदार होत दर्शनाचा लाभ घेतला.

हेही वाचा :

The post नाशिक : सुवर्ण मुखवटा शृंगार पूजेनिमित्त त्र्यंबकला भाविकांची गर्दी appeared first on पुढारी.