नाशिक : सेझमधील 250 एकर जमीन स्टाइसला द्यावी – स्टाइस

स्टाइस www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
स्टाइसच्या माध्यमाने सिन्नरच्या उद्योगवाढीला अधिक चालना देण्यासाठी रतन इंडियाच्या सेझमधून 250 एकर जमीन स्टाइस संस्थेला मिळावी, अशी मागणी संस्थेच्या वतीने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली. खासदार हेमंत गोडसे यांच्यासह स्टाइसचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी मुंबई येथे मंत्रालयात ना. सामंत यांची बुधवारी (दि. 9) भेट घेतली व विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. माळेगाव एमआयडीसी ते सेझपर्यंत नव्याने टाकल्या जाणार्‍या पाइपलाइनमधून स्टाइस संस्थेचे दररोज 2500 घ. मी. पाणी आणण्यास परवानगी मिळावी. तसे झाल्यास स्टाइसमधील उद्योगांचा पाण्याचा प्रश्न मिटण्यास हातभार लागणार असल्याचे चेअरमन आवारे यांनी ना. सावंत यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी संस्थेचे संचालक विठ्ठल जपे, नीलकमल कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट दिनकर कठाडे आदी उपस्थित होते.

उद्योगमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
दरम्यान, स्टाइस संस्थेच्या मालकीची नीलकमल कंपनीस द्यावयाची जमीन सेझच्या संपादन प्रस्तावातून वगळावी, अशी मागणीही पदाधिकार्‍यांनी मांडली. उद्योगमंत्री सांमत यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली व ऑर्डर करून घेतली असल्याचे चेअरमन आवारे यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : सेझमधील 250 एकर जमीन स्टाइसला द्यावी - स्टाइस appeared first on पुढारी.