नाशिक : सोयी-सुविधा नाही, 20 किलोमीटर निघाल्या पायी

कळवण,www.pudhari.news

नाशिक : (कळवण) पुढारी वृत्तसेवा

नाशिकच्या कळवण तालुक्यातील कनाशी येथील शासकीय आदिवासी मुलींना वसतिगृहात आवश्यक त्या सोयी सुविधा मिळत नसल्याने सुमारे २५० विद्यार्थ्यांनी कळवणच्या एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयावर पायी मोर्चा काढला आहे.

आदिवासी वसतिगृहात सोयी-सुविधांच्या अभावामुळे अनेकदा विद्यार्थी विविध माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत असतात.  हमारी मांगे पुरी करो…आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे…आम्हाला साथ द्या अशी आर्त साद घालत व घोषणा देत मुली निघाल्या आहेत. तब्बल 20 किलोमीटर पायी मोर्चा मुलींनी काढला आहे. मुलींनी अचानक हा पायी मोर्चा काढल्याने स्थानिक प्रशासनाची देखील धावपळ उडाली आहे.

The post नाशिक : सोयी-सुविधा नाही, 20 किलोमीटर निघाल्या पायी appeared first on पुढारी.