नाशिक : स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा मृत्यू

अपेक्षा नवज्योत भालेराव www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

जेलरोड परिसरातील पवारवाडी येथे स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपेक्षा नवज्योत भालेराव ( रा. पवारवाडी, हरिओम दर्शन सोसायटीसमोर, जेलरोड, नाशिकरोड ) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. अपेक्षा हिला नवीन मराठी शाळेची स्कूल व्हॅन घरी सोडवण्यासाठी आली होती. स्कूल व्हॅनमधून अपेक्षा खाली उतरून व्हॅनच्या पाठीमागून घराकडे निघाली असताना व्हॅनचालकाने अचानक गाडी रिव्हर्स मागे घेतली. त्यामुळे मागच्या टायर खाली सापडून अपेक्षाला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉ. सुनील मोकासरे यांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस हवालदार भोळे पुढील तपास करीत आहे.

The post नाशिक : स्कूल व्हॅनच्या धडकेत आठवर्षीय बालिकेचा मृत्यू appeared first on पुढारी.