नाशिक : स्त्री उद्यमी फाउंडेशन-रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचा उपक्रमामुळे आदिवासी महिलांना दिलासा

रोलिंग ड्रम www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या तीव्र उन्हाळा जाणवत असून, त्यात पाण्याची टंचाई ही अत्यंत गंभीर समस्या आजही भेडसावत आहे. त्यातही दुर्गम भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना डोक्यावर हंडा घेऊन अनेक किलोमीटर पायपीट करावे लागते. ही गोष्ट लक्षात घेऊन स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ यांच्यातर्फे आणि ऋणमुक्त फाउंडेशनच्या सहकार्याने आदिवासी महिलांना 100 रोलिंग ड्रमचे वाटप करण्यात आले. त्यामुळे या महिलांचे आयुष्य बदलले आहे.

सुरगाणा येथील चिंचपाडा, चिरयाचा पाडा आणि खोकर विहीर येथे ‘मिशन 2023 हर घर जल’ राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत 100 ड्रमसाठी लोकसहभागातून देणगी गोळा करण्यात आली. यासाठी अनेक व्यक्ती आणि संस्थांनी देणगी दिली. हा मोठा उपक्रम देणगी देणार्‍यांशिवाय केवळ अशक्य होता, त्यांनी ठेवलेल्या विश्वासाबद्दल स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपाली चांडक यांनी आभार मानले. या उपक्रमामुळे 100 महिलांची समस्या दूर होणार असल्याचे रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे सचिव परेश महाजन यांनी सांगितले. प्रकल्पाचे समन्वयक आशिष चांडक मनोगतात म्हणाले की, आदिवासी भागात आणखी वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा मानस असून, या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांना सहभागी करून घेतले जाणार असल्याचेही नमूद केले. ऋणमुक्त फाउंडेशनच्या रूपल गुजराथी यांनी मनोगत व्यक्त करताना जल परिषद फाउंडेशनच्या देवीदास कामाडी, दुर्वादास गायकवाड आणि संपूर्ण टीमच्या विशेष सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी राधिका पवार, प्रज्ञा अडांगळे, पवन पवार, संदीप शिंदे, संदेश मेहंदळे, गीता देसाई, शीला गुजराथी, राजेंद्र धारणकर, अमीर मिर्झा, प्रशांत सारडा, नरेंद्र पाटील, भावेश पटेल, निखिलेश काळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : स्त्री उद्यमी फाउंडेशन-रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचा उपक्रमामुळे आदिवासी महिलांना दिलासा appeared first on पुढारी.