नाशिक : स्मशानभूमी परिसरात सापडला अर्धवट जळालेला मृतदेह

मृतदेह,www.pudhari.news

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा

शहरात सोमवारी (दि. 27) सकाळी 7.30 च्या सुमारास स्मशानभूमी परिसरात अनोळखी युवकाचा अर्धवट जळालेल्या स्थितीतील मृतदेह आढळला. हा घातपाताचा प्रकार की, आत्महत्या याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दारणा नदीलगतच्या स्मशानभूमी शिवारात युवकाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत नागरिकांना दिसताच याबाबत घोटी पोलिसांना माहिती दिली. घोटी पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह अंदाजे 25 ते 30 वयोगटातील युवकाचा असून, डाव्या हातावर आर. एम. तर उजव्या हातावर जीविता एन. आर. असे गोंदलेले आहे. नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

हेही वाचा : 

The post नाशिक : स्मशानभूमी परिसरात सापडला अर्धवट जळालेला मृतदेह appeared first on पुढारी.