नाशिक : स्मशानभूमी रस्त्यावरील पुलासाठी “त्यांनी” केले प्रतिकात्मक तिरडी आंदोलन

नांदगाव www.pudhari.news

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा

नांदगाव येथे स्मशानभूमी रस्त्यावरील पूल तयार करण्यात यावा, या मागणीसाठी सरण रचत तिरडी बांधून प्रतिकात्मक आंदोलन “तुम्ही आम्ही नांदगावकर” यांच्या वतीने काढण्यात आली. या अनोख्या अंदोलना दरम्यान चिता रचत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती.

“झोपलेले प्रशासन जागे व्हा, प्रशासनाचा धिक्कार असो”, “या प्रशासनाचे करायचे काय, खाली डोकं वर पाय” या सारख्या प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. शहरा लगत जाणारा जुना पाझंन रोड, वडाळकर वस्ती, आदिवासी वस्ती तसेच नांदगाव शहरातील मुख्य स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जाण्यासाठी मुख्य रस्ता असूनही गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावरील पुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. नदीची पाणी पातळी वाढताच या भागातील दळणवळणाचा मोठा प्रश्न तयार होतो. तसेच या भागातील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे याप्रकरणी नांदगाव येथे स्मशानभूमी रस्त्यावरील पूलाच्या मागणीकरीता प्रशासनाकडे  “तुम्ही आम्ही नांदगावकर” यांच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाप्रसंगी विजू पाटील, संतोष गुप्ता, वाल्मिक टिळेकर, जगताप, विशाल वडगूले, वाल्मिक टिळेकर, प्रविण सोमासे, सागर आहेर, विकास भावसार, अवी महाजन, शरद महाजन, मधुकर खैरनार, गंगा जाधव, श्रावण आढाव, अशोक पाटील, बाळासाहेब देहाडराय, समाधान आहेर, अर्जुन गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ व महिलावर्गही मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

हेही वाचा:

The post नाशिक : स्मशानभूमी रस्त्यावरील पुलासाठी "त्यांनी" केले प्रतिकात्मक तिरडी आंदोलन appeared first on पुढारी.