नाशिक : स्वयंसेवकांबरोबर फोटो काढून राज ठाकरेंचे माणुसकीचे दर्शन

राज ठाकरे,www.pudhari.news

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या व्यस्त दौऱ्यावेळी वेळात वेळ काढून निमा प्रदर्शनास भेट देत उद्योजकांचा आनंद तर द्विगुणित केलाच परंतु प्रदर्शनासाठी राबणाऱ्या स्वयंसेवकांबरोबर छायाचित्र काढून युवावर्गाला खूश करत आपल्या माणुसकीचे दर्शन घडवले.

राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेची प्रचिती निमा प्रदर्शनावेळी आली. त्यांचे प्रदर्शनस्थळी आगमन होताच निमा अध्यक्ष धनंजय बेळे, प्रदर्शन चेअरमन मिलिंद राजपूत, सचिव राजेंद्र अहिरे व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. राज ठाकरे यांनी अर्ध्या तासाच्या भेटीत प्रदर्शनातील स्टॉलधारकांकडून उत्पादनांची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर छायाचित्र आणि सेल्फी काढण्यास सर्वांनी एकच गर्दी केली होती. प्रदर्शनस्थळी विविध महाविद्यालयांचे 100 हून अधिक विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून भूमिका बजावित आहेत. त्यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर छायाचित्र काढण्याची इच्छा व्यक्त केली. राज ठाकरे यांनी त्याबाबत काहीही आढे-वेढे न घेता संमती देत ग्रुप छायाचित्र काढून या सर्वांनाच सुखद धक्का दिला. त्यामुळे युवावर्गाचे चेहरे आनंदाने खुलले होते.

हेही वाचा :

The post नाशिक : स्वयंसेवकांबरोबर फोटो काढून राज ठाकरेंचे माणुसकीचे दर्शन appeared first on पुढारी.