
पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
शहरातील केवडीवन येथे गोदेकाठी बीएपीएस स्वामीनारायण संस्थेतर्फे राजस्थानातील गुलाबी पाषाणात सुंदर कोरीव नक्षीकाम केलेले त्रिशिखर मंदिर उभारण्यात आले. कार्यक्रमांतर्गत स्वामीनारायण मंदिर महिला मंडळाव्दारे शनिवारी सायंकाळी 4 वाजता महिलांनी भव्य जलयात्रा काढली.
मंदिरातील मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव 23 सप्टेंबरपासून सुरू झाला असून, सतत 10 दिवस विविध सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रम सुरू झाले आहे. दर 12 वर्षांनी नाशिक-त्रंबकेश्वरला कुंभमेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात येते. संतसाधू आणि लाखो भक्त रामकुंडात स्नान पर्वणीचा लाभ घेतात. अशा या जलयात्रेचा शुभारंभ गोदावरी नदीतील रामकुंड येथून सुरू झाला. मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, जुना व नवीन आडगाव नाका, तपोवन आणि स्वामीनारायण मंदिर केवडीवन अशा मार्गाने ही जलयात्रा निघाली. रामकुंडातील पवित्र जलाने नूतन मंदिरात दि.28 सप्टेंबरला प्रतिष्ठित करण्यात येणार्या मूर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे.
हेही वाचा:
- कोल्हापूर : दागिने, चप्पल, गुळासह मसाल्यातून कोट्यवधीची उलाढाल अपेक्षित
- शेतकर्याने काढली बैलाची अंत्ययात्रा; शिक्रापूर येथील कुटुंबाने जपली माणुसकी
- ‘India@75: India-UN Partnership in Action’ : ‘गरीब देश ते जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था’ – यूएनमध्ये जयशंकर यांनी मांडला भारताच्या विकासाचा चढता आलेख
The post नाशिक : स्वामीनारायण मंदिर महोत्सवानिमित्त जलयात्रा appeared first on पुढारी.