नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती यांचे निधन

स्वामी सागरानंद सरस्वती यांचे निधन

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा 

अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदचे अध्यक्ष श्री महंत स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांचे आज पहाटे सहा वाजेच्या निधन झाले. त्यांनी वयाची शंभरी पार केली होती. त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा १९६८,१९८०,१९९२ ,२००३ व २०१५ असे पाच कुंभमेळा त्यांच्या मार्गदर्शनाने संपन झाले आहेत.

झालेल्या प्रत्येक कुंभमेळ्यात त्यांनी शासन अधिकारी आणि साधू यांच्यात समन्वय साधला. अत्यंत मनमिळावू शांत संयमी साधू म्हणून ते सर्वदूर परिचित होते. त्यांचे हजारो शिष्य आहेत. प्रापंचिक साधकांनी त्यांची गुरुदिक्षा घेतली आहे. गुरुपौर्णिमा असेल तेव्हा त्यांच्या गणपतबारी आश्रमात यात्रेचे स्वरूप येत असायचे. आयुर्वेदाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. लाखो रुग्णावर त्यांनी निःशुल्क उपचार केले. आज सायंकाळी चार वाजता रींगरोड येथील आनंद आखडा गजलक्ष्मी मंदिर येथे दुपारी चार वाजता समाधी देणार आहेत.

The post नाशिक : स्वामी सागरानंद सरस्वती यांचे निधन appeared first on पुढारी.