
इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील महिलेचा हरवलेला ७ वर्षांचा मुलगा घोटी पोलिसांच्या तत्परतेने अवघ्या तासाभरात सापडला आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही वेळात या बालकाचा शोध लावला. बालकाला आई-वडिलांच्या ताब्यात दिले असून, आईने आनंदाच्या अश्रूधारांचा वर्षाव करीत पोलिसांचे ऋण व्यक्त केले.
घोटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक संदेश पवार, पोलिस हवालदार प्रसाद दराडे, सतीश शेलार, योगेश यंदे, शिवाजी शिंदे यांनी ही कामगिरी केली. शीतल सोमनाथ शिद (वय २९, रा. अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर) ही महिला पती आणि लहान मुलांना घेऊन घोटी येथे बाजारासाठी आली होती. शुक्रवारी (दि.18) दुपारी २ वाजता त्यांचा ७ वर्षांचा मुलगा ओमकार सोमनाथ शिद बाजारात अचानक हरवला. ही बाब ध्यानात आल्यावर सर्वांनी बालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शोध लागला नाही.
अखेर घोटी पोलिस ठाणे गाठून शोध लावण्याची विनंती केली. पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सहायक पोलिस उपनिरीक्षक संदेश पवार, पोलिस हवालदार प्रसाद दराडे, सतीश शेलार, योगेश यंदे, शिवाजी शिंदे यांनी कार्यवाही सुरू केली. अवघ्या काही वेळात बालकाला महामार्ग भागातील भगतसिंग नगर येथून शोधले. यामुळे मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा :
- कोळ्याच्या शरीरातून उगवली मोडासारखी बुरशी
- Gadar 2 ची दहाड; तब्बल ३०० कोटींचा ओलांडला टप्पा
- नाशिक : श्रावणी सोमवारकरिता सिटीलिंकच्या जादा बसेस, त्र्यंबकेश्वरला १२५ अतिरिक्त फेऱ्या
The post नाशिक : हरवलेला मुलगा घोटी पोलिसांनी तासाभरात शोधला appeared first on पुढारी.