
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इंदिरानगर बोगद्याजवळ हवेत गोळीबार केल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती. याप्रकरणातील मुख्य संशयितास मुंबईनाका पोलिसांनी अटक केली आहे. सुनील देविदास चोरमारे (३२, रा. सिडको कॉलनी, राणेनगर) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्तुल जप्त केली आहे.
चार जानेवारीला मध्यरात्री अविनाश विक्रम टिळे (रा. धात्रक फाटा, पंचवटी) हे संशयित चोरमारेचे मित्र असून, त्याची वापरास घेतलेली एमएच ०१ बीजी ५८८१ क्रमांकाची दुचाकी परत करण्यासाठी इंदिरानगर बोगद्यासमोरील साईनाथ चौफुलीजवळ गेले होते. त्यावेळी संशयित चोरमारे याने टिळे यांना पाहून गावठी पिस्तुलीतून हवेत गोळीबार केला. तर संशयितासोबत असलेल्या संशयित जग्गु सांगळे, राज जोशी यांनी अविनाशला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयित जग्गू सांगळे यास पोलिसांनी अटक केली. मात्र मुख्य संशयित चोरमारे पसार झाला होता. दरम्यान, मुंबई नाक्याचे सहायक पोलिस निरीक्षक साजिद मन्सुरी यांना संशयित चोरमारेबाबत माहिती मिळताच त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गावरील हॉटेल एम्पायरजवळ सापळा रचला. त्यास पकडून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तुल जप्त केली आहे.
हेही वाचा :
- Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेबांचे विचारधन आता मलेशियन विद्यापीठात
- अलिबाम : २५० कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट; सीमाशुल्क विभागाची कारवाई
- सांगली : एनर्जी मीटरचे प्रमाणीकरण न करताच काढले बिल
The post नाशिक : हवेत गोळीबार करणारा गजाआड appeared first on पुढारी.