नाशिक : हिरवी मिरची कडाडली, क्विंटलला मोजा 4 हजार

हिरवी मिरची

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या तीन दिवसांपासून हिरव्या मिरचीची आवक सरासरी 165 क्विंटल झाल्याने 3,500 रुपये क्विंटल कमाल भाव मिळाला. त्यामुळे सर्वसाधारण बाजारातदेखील मिरचीचा दर हा 30 ते 40 रुपये किलोपर्यंत गेला होता. एकूणच बाजारात हिरवी मिरची कडाडली आहे. बाजार समितीत गेल्या आठवड्यात हिरव्या मिरचीची आवक कमी झाल्याचे चित्र होते, तर अलीकडे पुन्हा आवक वाढ दिसून आली आहे. मागणी व आवक यांच्यात चढउतार कायम आहे. शुक्रवारी (दि. 17) 130 क्विंटल आवक होऊन 2,000 ते 4,000 असा प्रतिक्विंटल दर मिळाला.

हेही वाचा:

 

The post नाशिक : हिरवी मिरची कडाडली, क्विंटलला मोजा 4 हजार appeared first on पुढारी.