नाशिक : हिरावाडीत साडेसात लाखांची घरफोडी, २२ तोळे दागिन्यांसह रोकड चोरीला

घरफोडी,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

हिरावाडी रोड येथील महालक्ष्मीनगरमधील राहत्या घरात असलेल्या दुकानाचे शटर उचकटून कपाटातून सुमारे २२ तोळे सोन्याचे दागिने व चांदीसह टीव्ही, मोबाइल व ३१ हजार रुपयांची रोकड असा जवळपास साडेसात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.२६) उघडकीस आली.

विलेश राजदे (वय ५२, रा. महालक्ष्मीनगर, हिरावाडी) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल दिली आहे. ते रविवारी (दि.२६) सायंकाळी नातेवाईकाच्या विवाह सोहळ्याला गेले असताना चोरट्याने त्यांच्या घरातील दुकानाचे शटर उचकटून घरात प्रवेश करून कपाटाचे लॉकर तोडत त्यातील ३१ हजार रुपये तसेच मंगळसूत्र, चेन, बांगड्या, अंगठ्या, सोन्याचे बिस्किट, लॉकेट व ३०० ग्रॅम चांदीच्या वस्तू एलईडी, मोबाइल फोन, प्ले स्टेशन, टॅब असा सात लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विवाह सोहळा आटोपून राजदे घरी परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

  • IND vs AUS Day 2 : ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का

नागरिक पोलिसांवर नाराज

मागील वर्षी याच परिसरातील एका फ्लॅटमध्ये लाखो रुपयांची घरफोडी झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी चोरट्याने लाखो रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते. या घटनेतील संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसताना आता पुन्हा याच महालक्ष्मीनगरमध्ये धाडसी घरफोडी झाल्याने नागरिकांकडून पंचवटी पोलिसांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : हिरावाडीत साडेसात लाखांची घरफोडी, २२ तोळे दागिन्यांसह रोकड चोरीला appeared first on पुढारी.