नाशिक : हेल्मेटधारी चोरट्यांनी लांबविला सहा तोळ्यांचा हार

Chain-snatching,www.pudhari.news

नाशिकरोड : हेल्मेट परिधान करून आलेल्या दोघा चोरट्यांनी रिता अशोक लोंध (वय 63) या महिलेच्या गळ्यातील तब्बल सहा तोळे वजनाचा एक लाख 80 हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार गांधीनगर येथे घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

रिता अशोक लोंध या आपल्या नातेवाईका समवेत गांधीनगर येथील दुर्गा पुजा उत्सवाला गेल्या होत्या. गांधीनगर प्रेस जवळ असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी आपली चारचाकी वाहन पार्किंग केले होते. पूजा आटोपून ते पार्किंग केलेल्या वाहनाकडे जात असताना अचानकपणे समोरून येणाऱ्या दुचाकीवर हेल्मेट परिधान करून आलेल्या दोघांनी रिता लोंध यांच्या गळ्यातील सहा तोळे वजनाचा व एक लाख 80 हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार ओरबाडून नेला.

दरम्यान घाबरलेल्या महिलेने व तिच्या नातेवाईकांनी चोरट्याला पकडण्यासाठी आरडा-ओरड केली परंतु चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेनंतर संबंधित महिलेने उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटने प्रकरणी उपनगर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चौधरी हे करत आहे

हेही वाचा :

The post नाशिक : हेल्मेटधारी चोरट्यांनी लांबविला सहा तोळ्यांचा हार appeared first on पुढारी.