नाशिक-हैदराबाद विमानात बाँब? एका कॉलने हादरली यंत्रणा; अखेर सत्य समोर

नाशिक :  शनिवारी (ता.२७) सायंकाळी नेहमीप्रमाणे ओझर तळावरून हैदराबादला जाण्यासाठी विमानाच्या उड्डाणाची तयारी सुरू असताना विमानाचे उड्डाण रोखले जाते... आणि एक कॉल येतो.... दूरध्वनीवरून ही कारवाई सुरू होते. पण सत्यता पडताळण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने केलेल्या तपासणीत अखेर सत्य समोर येते..

नाशिक-हैदराबाद विमानात बाँब? एका कॉलने हादरली यंत्रणा

नाशिकच्या ओझर येथील विमानतळाहून सायंकाळी हैदराबादला विमान जाते. शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे ओझर तळावरून हैदराबादला जाण्यासाठी विमानाच्या उड्डाणाची तयारी सुरू असताना विमानाचे उड्डाण रोखले जाते. एका दूरध्वनीवरून ही कारवाई सुरू होते. विमानात बाँब असल्याची माहिती ओझर एअरपोर्ट विभागाकडून दिली गेल्याने प्रवासी धास्तावले. मात्र या विमानास पुन्हा ओझर विमानतळावर सुरक्षित उतरविण्याबाबतची माहिती एअरपोर्ट नियंत्रण कक्षाने दिली. विमानात बाँब ठेवणाऱ्याचा तपास लागला असून, सुरक्षा यंत्रणेच्या सगळ्या तपासात या अफवेत कुठलेही तथ्य नसल्याचे पुढे आले. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

.....म्हणून प्रवाशाने केला कॉल
सुरक्षा यंत्रणेला व पोलिसांना १०० क्रमांकावर फोन करून हैदराबाद विमानात बाँब असल्याबाबतची माहिती देणाऱ्याचं नाव वीरेश असून, त्याला हैदराबादला जायचे होते. मात्र त्यास तिकीट न मिळाल्याने त्याने हा फोन केला होता. हैदराबाद विमानात बाँब ठेवल्याबाबत दोन व्यक्ती बोलत होत्या, असा खोटा फोन संशयित वीरेश याने १०० या क्रमांकावर केला होता. विमानातील प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. बाँबशोध पथकाने बाँबचा शोध घेतला. मात्र बाँब आढळून आला नाही, त्यानंतर पोलिसांनी फोन आलेल्या सातपूर भागात त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.  

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

पोलीसांनी संशयिताला घेतले ताब्यात

ओझर (नाशिक) विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानात बाँब असल्याच्या अफवेमुळे शनिवारी (ता. २७) रात्रीच्या उड्डाणाला विलंब झाला. अफवेची सत्यता पडताळण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने केलेल्या तपासणीत विमानाचे तिकीट न मिळाल्याने एका प्रवाशानेच ही अफवा पसरविल्याचे उघडकीस आले.