नाशिक-हैद्राबाद विमानात बॉम्ब असल्याचा कॉल; तपासात धक्कादायक माहिती उघड

नाशिक : नाशिक विमानतळावरुन हैदराबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा नाशिकच्या ग्रामीण पोलिसांना कॉल आला आणि सगळ्यांची एकच तारंबळ उडाली. तात्काळ विमानाची उड्डाणे थांबवण्यात आली आणि पोलिसांनी  बॉम्ब शोध पथकास सोबत घेत विमानतळ गाठले...

त्याला ताब्यात घेण्यात आले

नाशिक हैद्राबाद या  विमानात बॉम्ब असल्याचा फोन ग्रामीण पोलिसांना गेला आणि पोलिसांना तात्काळ बॉम्ब शोधक पथकाला सोबत घेत ओझर विमानतळ गाठले. विमानातील प्रवाश्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, बॉम्ब शोध पथकाने बॉम्ब चा शोध विमानात घेतला मात्र बॉम्ब आढळून आला नाही, त्याला सातपूर येथून चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले. विमानात बॉम्ब असल्याबाबतची माहिती देणाऱ्याच नाव  विरेश असूनत्याचे तिकीटावरुनही एअरलाईन स्टाफसोबत भांडण झाले होते.  त्याला हैद्राबादला जायचे होते मात्र त्यास तिकीट न मिळाल्याने त्याने विमानात बॉम्ब ठेवल्याबाबत दोन व्यक्ती बोलत होते असा खोटा फोन 100 या क्रमांकावर केला होता,

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

नेमके घडले काय?

हैद्राबादला जाण्यासाठी एका प्रवाशाने विमानाचे बुकिंग केले होते. मात्र.  काही  तांत्रीक अडचणी आल्याने त्याचे बुकिंग होऊ शकले नाही. दरम्यान त्या प्रवाशाने विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत बराच वेळ वाद घातला. पण त्याला कंपनीकडून दुसरे तिकीट काढण्यास सांगण्यात आले. तरी तो बराच वेळ वाद घालत राहीला. जेव्हा तो विमानतळातून बाहेर पडला तेव्हा त्याने खोडसाळपणा करत नाशिक ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षात निनावी कॉल केला.

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ