नाशिक हॉटेलमधून युवकांची सुटका प्रकरण :  मुली मारहाण झाल्याचे सांगूनही पोलिसांकडून संबंधित हॉटेलवर गुन्हा नाही? पाहा VIDEO

इंदिरानगर (नाशिक) : एका युवतीने शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे यांना फोन करून रडक्या व घाबरलेल्या आवाजात हॉटेल प्रशासने आम्हाला रात्री मारहाण केली असून, आम्हाला काम सोडून आमच्या गावी परत जायचे आहे असे सांगितले. त्यानंतर त्वरित कारवाई करण्यात आली आणि युवकांना सोडविण्यात आले.  हॉटेलमधील ११ युवक- युवतींना हॉटेल प्रशासनाकडून दमबाजी करत, तुम्ही येथून काम सोडून जाऊ शकत नसल्याचे सांगत त्यांना एका खोलीत बंदिस्त करून ठेवल्याचा व्हिडिओ ई- सकाळच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आला. युवक यात आपली आपबिती सांगत असूनही पोलीसांनी ह्या प्रकरणी गुन्हा दाखल केला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मुलांची आपबिती ऐकूनही पोलीसांकडून संबंधित हॉटेलवर गुन्हा नाही?

हॉटेलमधील ११ युवक- युवतींंना हॉटेल प्रशासनाकडून दमबाजी करत, तुम्ही येथून काम सोडून जाऊ शकत नसल्याचे सांगत त्यांना एका खोलीत बंदिस्त करून ठेवल्याची धक्कादायक चर्चा परिसरात सुरू आहे. याबाबत दराडे यांनी सांगितले, की डांबून ठेवलेल्या मुलींपैकी एकीने तिच्या मुंबईच्या मैत्रिणीला झालेला प्रकार सांगून सुटका करण्यासाठी मदत मागितली. नंतर तिच्या मैत्रिणीने हा प्रकार थेट गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना सांगितला. आव्हाड यांनी दराडे यांना फोनवर मुलींची सुटका कशी करता येईल, याबाबत नियोजन करण्यास सांगितले. दराडे यांनी मंत्री आव्हाड यांना प्रतिसाद देत रवींद्र गामने, रवींद्र चव्हाण आणि पोलिसांच्या मदतीने त्या सर्वांना आपल्या गावी पाठविले. मात्र, या मुलांनी मारहाण झाल्याचा आणि डांबून ठेवल्याचा व्हिडिओ प्रसिध्द होऊनही पोलिसांनी कोणताही गुन्हा संबंधित हॉटेलवर दाखल केला नाही. 

 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

आम्हाला काम सोडून आमच्या गावी परत जायचे आहे.
दरम्यान, यापैकी एका युवतीने दराडे यांना फोन करून रडक्या व घाबरलेल्या आवाजात हॉटेल प्रशासने आम्हाला रात्री मारहाण केली असून, आम्हाला काम सोडून आमच्या गावी परत जायचे आहे. कृपया आमची येथून सुटका करण्याची विनवणी केली. या घटनेचे गांभीर्य ओळखत दराडे यांनी पोलिस उपायुक्त विजय खरात यांना याबाबत माहिती दिली. इंदिरानगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईणकर आणि सहकाऱ्यांनी या युवक व युवतींशी भेट घेत त्यांना तेथून त्यांचे सामान घेऊन गेट बाहेर आणले. यानंतर पोलिसांची गाडी बोलावून या सर्वांना नाशिक रोड रेल्वेस्थानकावर सोडण्यात आले. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

त्या’ हॉटेलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी - दराडे

पाथर्डी फाटा भागातील नामांकित हॉटेलमध्ये कथितरीत्या डांबून ठेवलेल्या ११ युवक- युवतींची पोलिसांच्या मदतीने सुटका करणाऱ्या शिवसेनेच्या बाळा दराडे यांनी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे या हॉटेलची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी बुधवारी (ता.३) निवेदनाद्वारे केली. फोनद्वारे आणि अनेक व्हिडिओ मेसेजद्वारे या विद्यार्थ्यांनी आपबिती जाहीर केली आहे. या हॉटेलवर दंडुक्याने मारहाण करणे, डांबून ठेवणे, असे गंभीर आरोप केले आहेत. त्यापैकी एका विद्यार्थिनीने तर दराडे यांच्याशी संपर्क साधून कैफियत मांडली होती. मात्र, परप्रांतीय असल्याने आणि दबावात असल्याने पोलिसांनी विचारल्यानंतर त्यांनी काहीही तक्रार नाही. घरी जायचे आहे, अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करून याबाबत योग्य कार्यवाही करण्याची मागणी दराडे यांनी निवेदनाद्वारे केली. पोलिस आयुक्त या प्रकरणाबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

११ युवक- युवतींची सुटका करण्यात यश

गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी युवतीची तक्रार गांभीर्याने घेत शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे यांच्यामार्फत पाथर्डी फाटा भागातील एका नामांकित हॉटेलमधून ११ युवक- युवतींची मंगळवारी (ता. २) सुटका करण्यात यश आले. या सर्वांना हॉटेल प्रशासनाकडून दमबाजी करत, तुम्ही येथून काम सोडून जाऊ शकत नसल्याचे सांगत त्यांना एका खोलीत बंदिस्त करून ठेवल्याची धक्कादायक चर्चा परिसरात सुरू आहे.