नाशिक : हॉटेल व्यवस्थापक, कर्मचार्‍यांची पर्यटकांना मारहाण

महिला मारहाण www.pudhari.news

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये शनिवार व रविवारी मुंबई येथील पर्यटक कुटुंबासह आले असता एका रूममध्ये महिलेच्या अंगावर टाईल्स पडल्याने ती जखमी झाली. या घटनेची व्यवस्थापनाकडे तक्रार केली असता हॉटेलची बदनामी होईल या कारणाने व्यवस्थापकाने व कर्मचार्‍यांनी या महिला पर्यटकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला.

पर्यटकांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून हॉटेल व्यवस्थापक मनिष जैन व कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे रिसॉर्ट नेहमीच वादात सापडत असते. शनिवारी (दि.10) मुंबई येथील पर्यटक प्रमोद लोखंडे, अनिल गायकवाड व शार्दुल परदेशी (सर्व रा. नवी मुंबई) परिवारासह रेन फॉरेस्ट रिसॉर्ट येथे आले होते. शनिवारी या कुटुंबियातील एका महिलेच्या अंगावर टाइल्स पडल्याने ती जखमी झाली. दरम्यान शनिवारी प्राथमिक उपचार केल्यानंतर या पर्यटकांनी रविवारी हॉटेलचे व्यवस्थापक मनीष जैनसोबत या घटनेची तक्रार व चर्चा करण्यासाठी संपर्क केला. त्यानंतर व्यवस्थापनाने मुजोरी केल्याची तक्रार आहे. पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : हॉटेल व्यवस्थापक, कर्मचार्‍यांची पर्यटकांना मारहाण appeared first on पुढारी.