नाशिक : हॉर्न वाजवल्याने युवकाला लोखंडी रॉडने मारहाण

मारहाण

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

जुने सिडको परिसरात रस्त्यावर उभ्या असणाऱ्या घोळक्याला दुचाकीवरून जात असताना हॉर्न दिल्याने घोळक्यातील काही टवाळखोरांनी दुचाकी चालकाला लोखंडी रॉडने मारहाण करीत जखमी केल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २९) आकाश शिंदे (रा. शिवाजी चौक, जुने सिडको) हे रात्री साडेअकराच्या सुमारास राजे छत्रपती व्यायामशाळेकडून घराकडे जात असताना व्यायामशाळेजवळ गणपती मंडळाच्या समोर १० ते १५ जणांचा घोळका उभा होता. रस्ता अडवला गेल्याने दुचाकी चालक आकाश शिंदे यांनी हॉर्न वाजवला. यावेळी घोळक्यातील मुले बाजूला न झाल्याने बाजूला सरका, असे सांगण्याचा राग आल्याने जमलेल्या १० ते १५ टवाळखोरांपैकी एकाने लोखंडी रॉड घेऊन आकाश शिंदे यांना जबर मारहाण केली. शिंदे यांना डोक्यात लोखंडी रॉड लागल्याने ते जखमी अवस्थेत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळू लागले. जखमी आकाश यांना तत्काळ उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : हॉर्न वाजवल्याने युवकाला लोखंडी रॉडने मारहाण appeared first on पुढारी.