
नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क
नाशिक शहर होमगार्ड पथकातर्फे होमगार्ड व नागरिक संरक्षण दल यांच्या 76 वा वर्धापनदिनानिमित्त आज मंगळवारी, दि.13 रोजी नाशिक जिल्हा होमगार्ड कार्यालयातील प्रांगणात जिल्हासमादेशक माधुरी कांगणे-केदारे यांच्या अध्यक्षतेखाली परेड संचलन घेण्यात आले. तसेच परिसर साफसफाई, वृक्षारोपण, अल्पोहार आदी उपक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे कर्मचा-यांसाठी सर्व रोगनिदान शिबीर घेण्यात आल्याने त्याचा लाभ कर्मचा-यांनी घेतला. प्रशासकीय अधिकारी तथा शहर समादेशक दिनेश पवार, प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव, हरूण तडवी, केंद्रनायक पंकज नेरकर, प्रमुख लिपीक पाटील, वरिष्ठ लिपीक अभिषेक तांबडे, महाजन पलटन नायक यांसह आदी उपस्थित होते.
हेही वाचा:
- राज्यातील पहिले अॅक्टिव्ह थ्रीडी तारांगण रत्नागिरीत
- नाशिक : ‘राज्यपाल हटाव’साठी धोतरावर सह्यांची मोहीम
- धनुष्यबाणाच्या दाव्यांवर आता थेट नवीन वर्षातच सुनावणी
The post नाशिक : होमगार्ड, नागरिक संरक्षण दलाच्या 76 वा वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रम appeared first on पुढारी.