नांदगाव (जि. नाशिक) : सचिन बैरागी
तालुक्यातील आमोदे येथील युवा शेतकरी निवृत्ती पुंडलिक पगार यांनी काकडी पिकाच्या माध्यमातून तब्बल साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. 20 गुंठे शेडनेटमध्ये काकडीची लागवड केली होती. ३८ दिवसांनंतर काकडीचे उत्पन्नदेखील सुरू झाले. या काकडीच्या उत्पन्नातून तीन महिन्यांत सुमारे साडेचार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी घेतले.
पगार यांनी आपली पारंपरिक शेती करत काकडी, मिरची, गिलके, कारले, डाळिंब लागवड करत अशा मार्गाने उत्पन्नाचा टप्पा वाढवला. त्यांनी सध्या २० गुंठे शेडनेटमध्ये काकडीची लागवड केली आहे. ३८ दिवसांनंतर काकडी काढण्यास सुरुवात झाली असून, त्या काकडीला सध्या चांगला भाव मिळत असल्याने त्यातून उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर मिळण्यास सुरुवात झाली आहे.
आतापर्यंत १५ ते १६ टप्प्यांत जवळपास २५ ते २७ टन पीक निघालेले आहे, तर अजूनदेखील ५ ते ७ टन उत्पन्न निघेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. काकडीसाठी सेंद्रिय खत, भेसळ डोस, फवारणीसाठी लागणारी औषधे, मल्चिंग पेपर, बियाणे दोरा बांधणे यासाठी एक लाख रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. हा खर्च वजा करता त्यांना सुमारे ४ लाख रुपये निव्वळ नफा मिळेल असा त्यांचा अंदाज आहे. त्यांना पसुरा कंपनीचे प्रतिनिधी योगेश भदाणे तसेच नांदगाव तालुका कृषी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचेही मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा :
- नाशिक : दहा दिवसांत सव्वातीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई, शहर वाहतूक शाखेची मोहीम
- नाशिक : सुपलीची मेट प्रश्नी यंत्रणा हलली, तहसीलदार श्वेता संचेती यांच्याकडून पाहणी
- Titan submarine : टायटन पाणबुडी अब्जाधीशांसाठी ट्रॅप
The post नाशिक : २० गुंठे काकडीतून शेतकऱ्याने घेतले साडेचार लाखांचे उत्पन्न appeared first on पुढारी.