
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र गहाळ झाल्याची नोंद करण्याच्या मोबदल्यात ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिस नाईकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. सरकारवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक मधुकर दत्तू पालवी (४२) असे या संशयित लाचखोराचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३९ वर्षीय तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या कारचे वाहन नाेंदणी प्रमाणपत्र हरवले होते. प्रमाणपत्र गहाळ झाल्याची नोंद करण्यासाठी ते मंगळवारी (दि.२०) सरकारवाडा पोलिस ठाण्यात गेले. त्यावेळी पोलिस नाईक पालवी यांनी तक्रारदाराकडे ५०० रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळवली. विभागाने सापळा रचत गुरुवारी (दि.२२) लाचेची रक्कम घेताना पालवी यास रंगेहाथ पकडले.
हेही वाचा :
- BAN vs IND 2nd Test | भारताला दोन धक्के, के एल राहुल, शुभमन गिल माघारी
- NDA : छोट्या खेड्यातील सानिया मिर्झाची आकाशाला गवसणी, बनणार भारताची ‘पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट’
The post नाशिक : ५०० रुपयांची लाच घेताना सरकारवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक जाळ्यात appeared first on पुढारी.