नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लिलावाद्वारे टोमॅटो खरेदी करून पैसे थकवत शेतकर्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात व्यापारी व आडतदार दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 18 शेतकर्यांनी 16 लाख 24 हजार 222 रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली असून, फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
रवींद्र बद्रिनाथ तुपे (51, रा. तिडकेनगर, उंटवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 1 जुलै 2021 ते 23 जुलै 2022 या कालावधीत संशयित पुष्पा विलास शिंदे व विलास बाबूराव शिंदे (दोन्ही रा. दिंडोरी रोड) यांनी टोमॅटो खरेदी करत फसवणूक केली. शेतकरी ज्ञानेश्वर डेमसे यांच्यासह 17 शेतकर्यांचा टोमॅटोचा माल लिलावाद्वारे शिंदे दाम्पत्याने खरेदी केला. मात्र, मालाचे पैसे देण्यास टाळाटाळ केली. वारंवार मागणी करूनही संशयितांनी पैसे थकविल्याने शेतकर्यांनी बाजार समितीकडे दाद मागितली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. पंचवटी पोलिस तपास करीत आहे.
हेही वाचा :
- बर्मिंगहॅम राष्ट्रकूलमध्ये पदकांचे शतक होणार का?
- वडगावच्या बाजारपेठेत गावठी पिस्तुल बाळगणारा जेरबंद
- सोलापुरात तब्बल 22 स्कूलबस जप्त
The post नाशिक : 18 शेतकर्यांना 16 लाखांचा गंडा, टोमॅटो खरेदी करत पैसे थकविले appeared first on पुढारी.