नाशिक : 46 गावांनी पुकारलेल्या बंदला 100 टक्के प्रतिसाद

लासलगाव मराठा मोर्चा,www.pudhari.news

लासलगाव (जि. नाशिक) : वार्ताहर

जालना येथील मराठा समाज आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ भगरीबाबा मंदिर ते लासलगाव पोलीस कार्यालय येथे हजारो महिला पुरुषांनी जोरदार घोषणाबाजी देत विराट मोर्चा काढला. सदरचा विराट मोर्चा लासलगाव पोलीस कार्यालयात आला असताना काही मान्यवरांची भाषणे झाली परंतु या मोर्चा समोर येवला तालुक्याचे आमदार व मंत्री छगन भुजबळ  यांचे स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी भाषण सुरू केल्यानंतर भुजबळ हे दुट्टप्पी भूमिका घेतात असे म्हणत  भुजबळ यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत राजकीय नेत्यांना भाषण करण्यास विरोध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केल्याने एकच गोंधळ उडाला. हा गोंधळ  निर्माण झाल्याने कार्यक्रम अर्धवट सोडण्यात आला.

सोमवारी सकाळी नऊ वाजता विंचूर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमा झाल्यानंतर महाआरती घेण्यात आली. त्यानंतर सर्व लासलगाव येथील परमपूज्य भगरी बाबा मंदिर जवळ जमा झाले. तेथून हातात भगवे घेऊन घोषणा देत सर्व मोर्चेकरी लासलगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी जमा झाले. त्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात अन्नपुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे मार्गदर्शन करण्यासाठी उभे राहिले असता मोर्चात सहभागी मराठा समाजाच्या सहभागी झालेल्या व्यक्तींनी त्यांना प्रखर विरोध करत त्यांचे भाषण बंद पाडले. त्यानंतर प्रचंड गोंधळ निर्माण झाला. या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ यांच्या विरोधात अपशब्द  वापरुन घोषणाबाजी करण्यात आली. सहभागी झालेल्या लोकांनी प्रचंड गोंधळ निर्माण झाला पोलीस स्टेशनच्या आवारात तणावपूर्ण वातावरण झाल्याने अखेर लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी समयसुचवता दाखवत सर्वांची समजूत काढत उपस्थित मोर्चे करी यांचे समोर कोणीही  राजकीय भाषणे करू नका आणि शांतता मार्गाने आपली भूमिका मांडावी असे आवाहन केले. मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी तरी सुद्धा गोंधळ चालू ठेवला शेवटी घाई गर्दीत निवेदन देऊन कार्यक्रम आटोपता घेतला.

निवेदनाचा आशय असा की. निफाड तालुका पूर्व भाग सकल मराठा समाजाच्या वतीने दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीने राजीनामा घ्यावा व लासलगाव विंचूर चौफुलीवर संभाजी महाराजांचा पुतळा त्वरित बसवावा या मागण्या करण्यात आला. या वेळेला लासलगाव येथील दलित समाज, मुस्लिम समाज, वंजारी समाज, जैन समाज व माळी समाज यांच्या वतीने पाठिंबा व्यक्त करण्यात आला. या वेळी रामनाथ शेजवळ, माजी उपसरपंच अफजल भाई शेख अशोक नागरे, गिरीश साबद्रा  व भुजबळ यांचे स्वीय सहायक  बाळासाहेब लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या निषेध मोर्चात माजी आमदार कल्याणराव पाटील, लासलगाव सरपंच जयदत्त होळकर, बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप, वेदिका होळकर, सरपंच शितल शिंदे, उपसरपंच मेघा दरेकर, ग्रामपंचायत सदस्य रेवती होळकर, लासलगाव डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षा संगीता सुरसे, विंचूर सरपंच सचिन दरेकर, नीरज भट्टड, संतोष पलोड, राजेंद्र राणा, अॅड. वाल्मीक गायकवाड, पांडुरंग राऊत, विलास गोरे, शिवा सुराशे, रवि होळकर, तानाजी आंधळे,  बबन शिंदे, गोपीनाथ ठुबे, हरिश्चंद्र भवर, डॉ.अमोल शेजवळ, मधुकर गावडे, मिरान पठाण, सुनील आब्बड, व्यापारी ओम प्रकाश राका, संतोष ब्रम्हेचा, गोकुळ पाटील, मंगेश गवळी, लहानु  मेमाणे,  भाऊसाहेब बोचरे, डॉ. रमेश सालगुडे, केदारनाथ फापाळे, राकेश फापाळे, देवगावचे माजी सरपंच विनोद जोशी, शंतनू पाटील, संदीप गायकर, गिरीश साबद्रा, संतोष राजोळे,  शंकर दरेकर, प्रवीण कदम, छत्र होळकर, ललित दरेकर, महेश होळकर, डाॅ.सुवर्णा चांदर, मयुर बोरा उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत आवारे, डॉ. सुजित गुंजाळ व डॉ. विकास चांदर यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड.  उत्तम  कदम यांनी मानले.

हेही वाचा :

The post नाशिक : 46 गावांनी पुकारलेल्या बंदला 100 टक्के प्रतिसाद appeared first on पुढारी.