नाशिक : 75 व्या वार्षिक निरंकारी संत सत्संगाचा समारोप

सत्संग www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
स्वतःला शांती व प्रेमाचे प्रतिरूप करून या दिव्य भावना जगभर पसरवत जावे, असे उद्गार निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज माता सुदीक्षाजी महाराज यांनी 75व्या वार्षिक निरंकारी सत्संगाच्या समारोप सत्रामध्ये काढले. या सत्संगामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून हजारो भक्तगण सहभागी झाले होते.

सद्गुुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वचनाद्वारे प्रेम, शांती व मानवतेचा दिव्य संदेश प्रसारित करणार्‍या या पाचदिवसीय सत्संगाची यशस्वी सांगता झाली. या सत्संगाच्या आयोजनाने समालखा (हरियाणा) येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळाचे प्रांगण श्रद्धा, भक्ती व प्रेमाच्या दिव्य प्रकाशाने आलोकित झाले होते. 10 वर्षांपासून सत्संगात होणार्‍या कायरोप्रॅक्टिक थेरपीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात मांसपेशी तसेच सांधेदुखीच्या त्रासांवर उपचार केले जातात. या शिबिरामध्ये विविध देशांतून जवळजवळ 55 कायरोप्रॅक्टिक तज्ज्ञांनी गरजू लोकांवर उपचार केले.

माता सुदीक्षाजी यांना शांतिदूत सन्मान…
सत्संगाच्या समारोपादरम्यान गांधी ग्लोबल फॅमिलीमार्फत सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांना शांतिदूत सन्मान प्रदान करून विभूषित करण्यात आले. गांधी ग्लोबलचे अध्यक्ष पद्मभूषण गुलाम नबी आझाद यांनी मुख्य मंचावर विराजमान सद्गुरू माताजींना हा सन्मान प्रदान केला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष पद्मश्री डॉ. वर्मा उपस्थित होते.

सेवा दल व अन्य भक्तांचे योगदान…
सुमारे 600 एकर मैदानावर आयोजित या सत्संगामध्ये मंडळाच्या विविध विभागांतील सेवादार भक्त आणि सेवा दलाचे सुमारे दीड लाख महिला व पुरुष स्वयंसेवक रात्रंदिवस सेवा करत होते.

हेही वाचा:

The post नाशिक : 75 व्या वार्षिक निरंकारी संत सत्संगाचा समारोप appeared first on पुढारी.