निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे श्रीधर नांदेडकर अध्यक्ष; नाशिकच्या सर्वाधिक १३ तर, अन्य राज्यातील २ कवींना संधी

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीधर नांदेडकर यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, या कवी संमेलनात सर्वाधिक १३ निमंत्रित नाशिकमधील असून, भोपाळच्या सूषमा ठाकूर व गोव्याच्या दीपा मिरिंगकर यांचाही सहभाग असेल. 

साहित्य संमेलनात परिसंवादाबरोबरच बालकवीकट्टा, कवीकट्टा व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सारस्वतांना मिळणार आहे. निमंत्रितांच्या कवी संमेलनात नाशिकसह, मराठवाडा, विदर्भ, मुंबई, पुणे, येथील कवींचा समावेश असून, प्रत्येकी नऊ कवींची निवड करण्यात आली आहे. ‘लक्षवेधी कवी’ या सत्रात मनमाडचे ज्येष्ठ कवी खलिल मोमिन यांची मुलाखत होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून नाशिकच्या काही कवींचा समावेश झाल्याने नाशिकची संख्या वाढली आहे. दरम्यान, संमेलनातील कवीकट्टामध्ये २ हजार ७५० कवीतांपैकी ४६७ कवींची निवड करण्यात आली असून, त्यातील सर्वाधिक ७० कवी नाशिकमधील आहेत. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

 यांचा असेल सहभाग 

नाशिक : प्रकाश होळकर, संजय चौधरी, संदीप जगताप, मिलिंद गांधी, रेखा भंडारे, विष्णू थोरे, कमलाकर देसले, राजेंद्र दिघे, सुशिला संकलेचा, लक्ष्मण महाडिक, प्रशांत केंदळे, काशिनाथ वेलदोडे, उत्तम कोळगावकर. 
मराठवाडा : दगडू लोमटे, सय्यद अल्लाउद्दीन, रवी कोरडे, प्रिया धारूरकर, मनोज बोरगावकर, वैजनाथ अनमुलवाड, भाग्यश्री केसकर, नंदकुमार बालुके, वाल्मीक वाघमारे. 

विदर्भ : इरफान शेख, किशोरी बळी, दिनकर वानखेडे, अनिल जाधव, विजय ढाले, तीर्थराज कापगते, मनोज पाठक, विष्णू सोळंके, गजानन मानकर. 
मुंबई : साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील, रामदास खरे, प्रवीण बापूलकर, गीतेश शिंदे, मनोज वराडे, वैभव साटम, गौरी कुलकर्णी, संगीता धायगुडे, विलास गावडे, अमोल शिंदे 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

पुणे : अजय कांडर, विनायक कुलकर्णी, अविनाश चव्हाण, संजीवकुमार सोनवणे, विजय जोशी, अंजली बर्वे, प्रशांत केंदळे, दयासागर बन्ने, साहेबराव ठाणगे.