नियतीचा एक घाव अन् शीर झाले धडावेगळे; घटनेने बघ्यांच्या अंगावर अक्षरश: काटाच

नाशिक : सायंकाळची वेळ...घरी जाण्याच्या ओढीने ते सुसाट निघाले होते. थोडा दूर जाताच मात्र घडले काही भलतेच. अन् काळाच्या धडकेने केला असा घात की काही क्षणातच कुटुंब पोरके झाले. घटनेने मदतीसाठी धावुन आलेले प्रत्यक्षदर्शींच्याही अंगावर अक्षरश: शहारे उभे राहिले. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

रविवार (ता. 17) सायंकाळची वेळ...नवनाथ बन्सी पवार (३०, रा. वऱ्हे दारणा, ता.निफाड) हे नानेगाव साखर कारखान्याच्या रस्त्यावरुन पवार हे त्यांच्या दुचाकीने (एम.एच१५ बीटी९५०३) भरधाव जात होते. यावेळी साडेसहा वाजेच्या सुमारास सावरकरनगर या लोकवस्तीजवळ नानेगावकडून दगड-माती घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरच्या (एम.एच१५ डीयू ४५९४) ट्रॉलीला त्यांची दुचाकी येऊन धडकली. या अपघातात पवार यांच्या डोक्याला ट्रॉलीचा जोरदार फटका बसला आणि त्यांचे शीर धडापासून वेगळे झाले. अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वार पवार यांचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला. यावेळी मदतीसाठी धावुन आलेले प्रत्यक्षदर्शींच्याही अंगावर शहारे उभे राहिले. या अपघातप्रकरणी ट्रॅक्टरचालक विकास दगु सानप याने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा रात्री उशिरा दाखल केला. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

शहरासह निफाड तालुक्यात हळहळ

गौणखनिजाची अवैध वाहतुक नागरिकांच्या जीवावर बेतू लागली असल्याची परिसरात चर्चा आहे. नानेगाव रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजाची चोरटी वाहतूक सुरु असते; मात्र याकडे कोणतीही शासकीय यंत्रणा गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टर-ट्रॉली, दुचाकी पोलीस ठाण्यात जमा केली आहे. पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस करीत आहेत.

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क