नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख मदतीची मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी – प्रवीण दरेकर

तळवाडे दिगर (जि.नाशिक) : गेल्या आठवड्यात बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात शनिवार (ता.२० ते बुधवार ता.२४) दरम्यान बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील तळवाडे दिगर,पठावे दिगर, मोरकुरे,दसाणे, केरसाणे, मुल्हेर, अंतापूर आदी गावात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाउस व गारपीट झाली. त्याचा फटका बसून तालुक्यातील १२ हजार पेक्षा जास्त हेक्टर कांद्या भाजीपालासह फळबागांचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आज शनिवार (ता.२७) रोजी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अवकाळी व गारपीटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला.

हातातोंडाशी आलेल्या घास हिरावला...

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील  गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भेट देऊन पाहणी केली. सटाण्याच्या पश्चिम पट्ट्यातील मोरकुरे ,पठावे ,तळवाडे दिगर ,केरसाणे, दसाणे, अंतापूर, मुल्हेर या गारपीट व अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेल्या घास हिरावून नेला . प्रविण दरेकर यांनी  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर  जाऊन नुकसानीची पहाणी केली. आस्मानी सुलतानी संकटाने  शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दरेकराकडे आपली कैफियत मांडताना डोळ्यात अश्रू आले.

हेही पाहा > महाराष्ट्र पोलिस अकादमीतील भावी फौजदार 'सैराट'! शासनाच्या नियमांची धज्जीया VIDEO VIRAL

नुकसान भरपाई देण्याची मागणी

.दरेकरांनी शेतकऱयांना दिलासा दिला. शेतकऱ्यांचे एवढे नुकसान होऊनही  मायबाप सरकारचा एकही प्रतिनिधी शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी फिरकले नाही. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. त्याबद्दल दरेकर  नाराजी व्यक्त करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  एक लाख रूपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न