नैताळेत मतोबा महाराजांची महापूजा उत्साहात; हजारो भाविक नतमस्तक 

नैताळे (जि. नाशिक) : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या नैताळे येथील ग्रामस्थांचे अराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मतोबा महाराज यांची गुरुवारी (ता. २८) पौष पोर्णिमेनिमित्त सकाळी साडेआठला महापूजा झाली. आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी बनकर व (कै.) शंकर केसू खलाटे यांच्या वारसदारांच्या हस्ते महापूजा व रथपूजा झाली. यात्रोत्सव रद्द केला असला तरी हजारो भाविकांनी मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. 

कोरोना प्रादुर्भावामुळे नैताळे येथे पौष पोर्णिमेपासून अखंड १५ ते २० दिवस चालणारा श्री मतोबा महाराजांचा यात्रोत्सव भरविला नाही. मात्र महापूजा व रथपूजा करण्यात आली. या वेळी व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, लासलगाव बाजार समितीच्या उपसभापती प्रीती बोरगुडे, संचालक वैकुंठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेचे प्रदेश सरचिटणीस सागर पाटील कुंदे, जिल्हा परिषेदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती राजेंद्र मोगल, नगरसेवक दिलीप कापसे, विलास मत्सागर, उत्तमराव जाधव, महेश चोरडिया, भीमराज काळे, संदीप गारे, संजय घायाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्याक्ष भूषण धनवटे, मोहन खापरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा देवस्थान ट्रस्टतर्फे राजेंद्र बोरगुडे, नवनाथ बोरगुडे, शिवाजी बोरगुडे यांनी सत्कार केला. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

शेजारील जागा मंदिराला दान 

महापूजेसाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांपैकी विठ्ठल खलाटे, रामभाऊ खलाटे, लक्ष्मण खलाटे, गंगाराम खलाटे, जगदीश खलाटे या बंधूनी मंदिराशेजारी असलेली जागा मतोबा महाराज देवस्थानला दान दिली आहे, अशी घोषणा महापूजेप्रसंगी करण्यात आली. 

कोरोना नियम पाळण्याचे आवाहन 

पौष पोर्णिमेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांना लाडूचा प्रसाद देवस्थानतर्फे वितरित करण्यात आला. श्री मतोबा महाराजांची यात्रोत्सव रद्द असला तरी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. दर्शनास येताना सोशल डिस्टन्सिंग ठेवावे व मास्क वापरावा, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल