नैसर्गिकदृष्ट्या, कृषीसंपन्न पश्चिम पट्ट्याकडे पर्यटन महामंडळाचे दुर्लक्षच!

गिरणारे ( जि. नाशिक) : नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात अनेक छोटे मोठे धरणं आहेत तसेच नैसर्गिक संपदेने भारलेले घाट,धबधबे,व वाडे पाडे,यासह संपन्न कृषिसंपन्न असा हा परिसर आहे. पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या या परिसरावर सातत्याने पर्यटन विकास महामंडळाचे दुर्लक्ष आहे.

हा परिसर दळणवळण व विकासाच्या दृष्टीने कायम दुर्लक्षित

पर्यटक येतात मात्र त्यांना कुठलीही सुरक्षितता व मूलभूत सुविधांची वानवाच आहे.नैसर्गिक संपन्नता असलेल्या या भागात पर्यटनाचे दृष्टीने आजपर्यंत पर्याप्त प्रयत्न झालेच नसल्याची टीका या भागातील सामाजिक पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केली आहे. दरी,गंगापूर,गोवर्धन,गंगावरहे मातोरी,मुंगसरा, दुगाव,वाडगाव, देवरगाव,आंबोली, नाईकवाडी,गिरणारे,धोंडेगाव, वाघेरा,हरसूल,ओझरखेड,खरशेत,देवडोंगरा,घनशेत या भागात वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे,नैसर्गिक,घाट,मंदिरे,धबधबे,ऐतिहासिक कुंड,बारवा,विविध किल्ले व विविध नद्यांचा परिसर दळणवळण व विकासाच्या दृष्टीने कायम दुर्लक्षित आहे,

पर्यटन विकासामुळे या भागाचे वाढतील रोजगार व उद्योग,व्यवसाय,

नाशिकला शासकीय विश्रामगृहाजवलच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयात अश्या कित्येक पर्यटन स्थळांची साधी माहिती ही मिळत नाही. मध्यंतरी पंचतारांकित हॉटेल्स मध्ये पर्यटन विभागाची बेवसाईट ला अशी कित्येक पर्यटन स्थळे दुर्लक्षित आहे.पर्यटन व रोजगार याची सांगड घालण्याची आजच्या काळ्या नितांत गरज असतांना मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे पर्यावरण कार्यकर्त्यांची तक्रार आहे.

निसर्गसंपदा लाभलेल्या भागाचा पर्यटन विकास दूरच

पश्चिम पट्ट्यात आदिवासी निसर्गरम्य भागात गावेच्या गावे रोजगारासाठी स्थलांतरित होतात,या लोकांना त्या निसर्ग पर्यटनाचे दृष्टीने सजग केले तर तिथे स्थानिक पर्यटन वाढेल,हरसूल,वाघेरा,खरशेत मार्गावरील घाट नैसर्गिक संपन्न आहे, येथे नैसर्गिक धबधबे आहेत, त्यात सापगावचा दुगार वाडी धबधबा,जुरांडेश्वर धबधबा,जंगल,जातेगावचे धरण, तळे,विविध नद्या त्याठिकाचे पक्षी,वाघेराचा किल्ला,ठाणापाडा येथील खैराई किल्ला, दावलेश्वरचा तास धबधबा,प्रशस्त दमनगंगा नदीचा बांगडी मार्ग, गडदाविनी देवी, पाताळेश्वर, धोंडेगावचे कश्यपी धरण, गंगापूर धरण, कोणे,नाईकवाडी,वाघेरा मध्यम प्रकल्प,दरी गावाचे दरर्यादेवी ग्रामदैवत देवस्थान,गिरणारेचे खंडोबा डोंगर,अहिल्यादेवी होळकर बारव,हरसूल गिरणारेचा आठवडे बाजार,आदर्श गाव नागलवाडी,डिजिटल शाळा आजूबाजूचे कृषी संपन्न परिसर बघता या भागातील अश्या पर्यटन स्थळांची नोंदणी करून त्यांच्या मूलभूत विकासासाठी पर्यटन महामंडळाने लक्ष घालावे तरच याभागात रोजगार वाढू शकेल, मात्र दूरदृष्टी नसलेल्या पर्यटन विभागाच्या निष्क्रियतेमुळे निसर्गसंपदा लाभलेल्या भागाचा पर्यटन विकास दूरच आहे अशी नाराजी दरयादेवी देवस्थान पर्यटन विकासासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते भारत पिंगळे,व भारतीय वृक्ष संवर्धन कार्याचे पर्यावरण मित्र तुषार पिंगळे यांनी केली आहे.

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

लक्ष देण्याची नितांत गरज

आमच्या भागाला पर्यटनाच्या दृष्टीने दळणवळण,व सोयीसुविधा सुरक्षित पर्यटन व त्यासाठी गाईड प्रशिक्षण दिले तर आम्हाला शिकलेल्या तरुणांना आमच्या भागात रोजगार मिळेल,तर स्थलांतर थांबुन आदिवासी भागातील लोकांचे छोटे मोठे व्यवसाय वाढतील,कृषी क्षेत्रात आमच्या कडे प्रयोगशील शेती केली केली जाते मात्र त्याकडे कृषी पर्यटन म्हणून बघितले जावे .मात्र याकडे कृषी,पर्यटन व स्थानिक लोकप्रतिनिधींचे सतत दुर्लक्षच आहे,याकडे जातीने लक्ष देण्याची नितांत गरजच आहे.- किरण उदार. कृषिमित्र, कोणे

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता