
जळगाव : येथील एमआयडीसीत प्लास्टिक कंपनीत कामावर आलेल्या तरुणाला इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाला आहे. तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे. (Jalgaon News)
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर तालुक्यातील शेलगाव येथील राहुल दरबार राठोड (वय 22) हा जळगावच्या फातिमानगर येथे राहत होता. तो सोमवारी एमआयडीसीतील एका प्लास्टिक कंपनीत कामाला रुजू झाला होता. कंपनीतील मशीनमध्ये काम करत असताना त्याला इलेक्ट्रिक शॉक लागला. त्याचा जागीच मृत्यू झाला. राहुलसोबत काम करत असलेल्या जीवन गजानन चौधरी (वय 20) हा गंभीररित्या भाजला गेला आहे. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राहुल हा गेल्या काही वर्षांपासून एमआयडीसीतील एका कंपनीत वेल्डींग करण्याचे काम करत होता. प्लास्टिक कंपनीत त्याने कामाला सुरुवात केली होती. कामाच्या पहिल्याच दिवशी त्याचा दुदैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- Pune Bhide Wada : पुण्यातील भिडेवाडा स्मारकाचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा निकाल शासन व महापालिकेच्या बाजूने
- बिल्डरांना दिलेल्या सरकारी जमिनींचा फेरआढावा घ्या : मीरा बोरवणकर
The post नोकरीचा पहिलाच दिवस, पण काळाने घात केला appeared first on पुढारी.