पंचवटीच्या प्रसिध्द राम रथातील ‘महाबली’ हनुमान नव्या रूपात!

नाशिक : पंचवटी मधील प्रसिद्ध राम रथातील्  हनुमान मुर्ती आत्ता नव्या रूपात येणार आहे.रस्ते आखाडा तालीम संघांच्या वतीने हा रामरथ मिरवणुकीत सहभागी केला जातो. या राम रथातील महाबली हनुमान मूर्ती सुमारे तीस वर्षांपूर्वी तीन फूट बाय तीन फूट व् चार फूट उंच अशा सागाच्या लाकडात शिल्पकार प्रकाश तुपे यांनी तयार केली होती. ही मुर्ती अखंड लाकडा पासून तयार केल्याने याला विशेष महत्व आहे.

मूर्ति नव्या रूपात दिसणार

तीस वर्षात या महाबली हनुमान मूर्तीवर रंगलेपन झाल्याने ती बेडब झाली होती. तिला नव्याने रूप देण्याचे काम सुरु आहे. येणाऱ्या राम रथ यात्रेत ही मूर्ति नव्या रूपात दिसणार आहे.

 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

हेही वाचा - "माझी चिमुरडी उपाशी असेल हो.." चिमुकलीचा लागेना थांगपत्ता; मातेचा आक्रोश