पंचवटी एक्सप्रेसच्या बोगीला आग; प्रवाशांमध्ये खळबळ! पाहा VIDEO

नाशिक : नाशिककरांची प्रवास वाहिनी असणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसच्या बोगीला आग लागली आणि एकच खळबळ उडाली. आग लागली तेव्हा या गाडीमध्ये प्रवासी प्रवास करत होते. काय घडले नेमके?

नाशिककरांची प्रवास वाहिनी पंचवटी एक्सप्रेसला आग

नाशिककरांची प्रवास वाहिनी असणारी पंचवटी एक्सप्रेस च्या b11 या डब्याच्या कपलिंगखाली चाका जवळ कल्याण स्थानकाच्या अलीकडे उंबरमाळी स्टेशन जवळ आज सकाळी आग लागली. गाडी मार्गक्रमण करत असताना बाहेर येत असल्यामुळे काही प्रवाशांनी चैन प्रवाशांनी ओढली आणि गाडी थांबवल्यानंतर खाली चाकाजवळ जाळ दिसून आला.

....तर मोठा अनर्थ झाला असता

तेव्हा त्यांनी तात्काळ आपल्या सामानासह गाडी खाली उतरणे पसंत केले. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नसून पंचवटी नियोजित स्थळी पोहोचायला उशीर झाला. हीच घटना जर कसारा घाटात घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता असे प्रवाशांनी 'सकाळ'ला सांगितले