पंधरा लाखांसाठी विवाहितेचा छळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा 

सिडको (जि.नाशिक) : सिडकोमध्ये एका विवाहितेचा उपाशीपोटी डांबून ठेवून तिचा अमानुष छळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून उपाशीपोटी डांबून ठेवले व तिच्या अंगावरील दागिने काढून लहान मुलासह घरातून हाकलून दिल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

१५ लाखांची मागणी

सिडकोच्या आदर्शनगरमधील विवाहितेकडे पती मनोज नानासाहेब बोरसे व इतर सहा जणांनी कार घेण्यासाठी १५ लाखांची मागणी केली. ही मागणी अमान्य केल्याने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिली. तिला उपाशीपोटी डांबून ठेवून तिचा छळ केला.

अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा

सासूने तिच्या अंगावरील दागिने काढून तिला एका वस्त्रानिशी लहान मुलासह घरातून हाकलून दिले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक बेडवाल तपास करीत आहेत.