पतीच्या डोळ्यासमोर बेपत्ता मायलेकीचा ़़तरंगता मृतदेह; संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ

सिन्नर (जि.नाशिक) : मायलेकी दोघी मध्यरात्री बारापासून बेपत्ता होत्या. सोमवारी सकाळी शोध घेत असताना सुभाष पावसे यांना स्वतःच्या शेतातील विहिरीत पत्नी सविता यांचा मृतदेह तरंगताना आढळला.आणि मग परिसरात एकच खळबळ उडाली.

पतीच्या डोळ्यासमोर बेपत्ता मायलेकीचा तरंगता मृतदेह

सविता सुभाष पावसे (वय ४०, रा. ढोकी फाटा, वडगाव, सिन्नर) व मुलगी साक्षी विकास सहाणे (१८, हिवरे, ता. सिन्नर) अशी मृत मायलेकीची नावे आहेत. या दोघी रविवारी (ता. २१) मध्यरात्री बारापासून बेपत्ता होत्या. सोमवारी सकाळी शोध घेत असताना सुभाष पावसे यांना स्वतःच्या शेतातील विहिरीत पत्नी सविता यांचा मृतदेह तरंगताना आढळला. याबाबत त्यांनी पोलिसपाटील मीरा पेढेकर यांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचताच मृतदेह आढळल्यानंतर संशय वाढल्याने पोलिसांनी बेलू येथील पट्टीचे पोहणारे गोविंद तुपे यांना पाचारण केले. तुपे यांना काही वेळातच साक्षीचा मृतदेहही मिळून आला. नगर परिषदेच्या दवाखान्यात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. साक्षी हिचा दीड महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

नातेवाइकांचा घातपाताचा संशय

वडगाव- सिन्नर शिवारातील ढोकी फाटा परिसरात महिला व तिच्या विवाहित मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या सोमवारी (ता. २२) सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मृत मायलेकींच्या नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ 

पाच जणांवर गुन्हा 
या प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. डुबेरे येथील समाधान वारुंगसे यांच्या फिर्यादीवरून सविता यांचे पती सुभाष पावसे, विमल भगत, सुमन सहाणे, विकास सहाणे, योगेश सहाणे अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

पोलीसांचा अधिक तपास

सिन्नर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गरुड, उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, हवालदार गंगाधर सारुक्ते, दीपक शार्दूल, भगवान शिंदे, समाधान बोऱ्हाडे, प्रमोद भोये, गोडे, चिने, खुळे आदींनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सारुक्ते तपास करीत आहेत.