पती सैन्यदलात, पदरी ३ वर्षांचा गोंडस मुलगा, बेपत्ता विवाहितेचा मृतदेह सापडला विहीरीत

सोग्रस (जि.नाशिक) : विवाहिता वैशालीचे माहेर देवळा तालुक्यातील वाखारी येथील असून, आठ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. वैशालीचा पती हा सैन्यदलात कार्यरत तर तिला साडेतीन वर्षांचा मुलगा आहे.असा सुखी संसार असून देखील वैशाली सोबत असे का घडले? याची सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहे.

दोन दिवसांपासून बेपत्ता

शिंदे येथील वैशाली महादेव ठोंबरे (वय २७) ही विवाहिता दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या सासरच्यांनी वडाळीभोई (ता. चांदवड) पोलिस ठाण्यात नोंदविलेली होती. बेपत्ता वैशालीचा परिसरात सर्वत्र शोध सुरू होता. सोमवारी (ता. १४) सायंकाळच्या सुमारास शिंदे शिवारातील ठोंबरे वस्ती येथील संजय शिंदे यांच्या गट क्रमांक ४६९ मधील शेतातील विहिरीत वैशालीचा मृतदेह आढळला. यामुळे शिंदे येथील पोलिसपाटील रामनाथ शिंदे यांनी ही माहिती वडनेरभैरव पोलिसांना देताच घटनास्थळी पोलिस आणि ग्रामस्थांनी उपस्थित होऊन मृतदेह विहिरीबाहेर काढून विच्छेदनासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. मंगळवारी (ता. १५) सकाळी शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदन अहवाल प्राप्त होऊन त्यात पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

आत्महत्या की घातपात ?
मृत वैशालीचे माहेर देवळा तालुक्यातील वाखारी येथील असून, आठ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. मृत वैशालीचा पती माधव ठोंबरे हा सैन्यदलात कार्यरत आहे. वैशालीस साडेतीन वर्षांचा मुलगा आहे. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास शिंदे येथील अमरधाममध्ये मृत वैशालीवर अंत्यसंस्कार झाले. या घटनेसंदर्भात वडाळीभोई पोलिस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे. शिंदे (ता. चांदवड) येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह गावातीलच विहिरीत आढळला आहे. या घटनेबाबत परिसरात आत्महत्या की घातपात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ