मनमाड (जि.नाशिक) : पती-पत्नीमध्ये वादविवाद होत असे. गुरुवारी सायंकाळी नामदेव आहिरे आणि त्यांची पत्नी सुनीता आहिरे यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली.
नेमका प्रकार काय
हनुमाननगर भागात नामदेव आहिरे अनेक दिवसांपासून वास्तव्यास होते. आहिरे पती-पत्नीमध्ये वादविवाद होत असे. गुरुवारी सायंकाळी नामदेव आहिरे आणि त्यांची पत्नी सुनीता आहिरे यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात नामदेव आहिरे याने पत्नी सुनीताच्या पोटावर, गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. वर्मी घाव लागल्यामुळे सुनीता रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. नामदेव आहिरे याने स्वतःच्या गळ्यावर, पोटावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. सुनीताला उपचारासाठी तातडीने मालेगाव येथे रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी
गुन्हा दाखल
पती नामदेव यालाही गंभीर जखमी अवस्थेत धुळे येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक पी. बी. गिते यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (ता. १) येथील हनुमाननगर भागात घडली. धारदार शस्त्राने पोटावर, गळ्यावर वार करत पत्नीची हत्या केली. पतीनेही स्वत:च्या पोटात धारदार शस्त्राने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी रात्री उशिरा मनमाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता