पत्रकारांमध्ये देश महासत्ता बनविण्याची ताकद – IGP प्रतापराव दिघावकर

दिंडोरी (जि.नाशिक) : जोपर्यंत शेतकरी सुखी होत नाही तोपर्यंत देश महासत्ता होऊ शकत नाही, त्यामुळे पत्रकारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने हाताळले पाहिजे. भारत देश जोपर्यंत महासत्ता बनत नाही तोपर्यंत पत्रकारांचे कार्य संपणार नाही ते अविरत सुरू असले पाहिजे. असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी केले.

पत्रकारांच्या लेखणीत खूप मोठी ताकद - दिघावकर

पत्रकार आणि पोलीस यांची रास एकच असून त्यांचे कार्यही एकच आहे. त्यामुळे पोलीस आणि पत्रकारांच्या समनव्ययातुन सामान्य जनतेच्या प्रश्न सुटले पाहिजे. पत्रकारांच्या लेखणीत खूप मोठी ताकद असून शेतकऱ्यांचे घामाचे पैसे बुडवाल तर गाठ माझ्याशी आहे हा मथळा वृत्तपत्रांतुन छापून येताच शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये व्यापाऱ्यांनी घरपोहोच केल्याचे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी केले.

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

सन्मान पत्रकारीतेचा कार्यक्रम उदघाटन प्रसंग

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नाशिक शाखेच्या वतीने नस्तनपुर(ता.नांदगाव) येथे बुधवारी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलेल्या सन्मान पत्रकारीतेचा 2020-2021 या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातील पत्रकारीता क्षेत्रात आपल्या लिखाणाच्या माध्यमातुन,समाजाच्या जडणघडणीसाठी महत्वाचे योगदान व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या गुणी तसेच किर्तीवंत पत्रकारांचा दिघावकर साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर तीर्थक्षेत्र येथे आयोजित कार्यक्रमात गुणगौरव करण्यात आला.

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

 

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी संपूर्ण राज्यात नाशिकची कार्यकारीणी सक्रिय असून त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. प्रमुख पाहुणे म्हणून मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, मनमाड उपअधीक्षक समरसिंग साळवे, डॉ.संतोष बजाज, राष्ट्रीय अध्यक्ष मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग अशोक छाबडीया राष्ट्रीय मुख्य महासचिव मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग, महंत योगी भूषणनाथ महाराज आदी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.