परदेशी दारूचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला; तळीरामांची उसळली गर्दी

देवळा (जि. नाशिक) : तालुक्यातील देवळा-सौंदाणे मार्गावरील पावजीबाबा मंदिराजवळ परदेशी मद्य घेऊन जाणारे ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने झाल्याने येथे मद्याच्या बाटल्या घेण्यासाठी तळीरामांची गर्दी उसळली. 

तळीरामांनी लांबवला माल

देवळा-सौंदाणे मार्गावर पावजीबाबा मंदिराजवळ दुपारी सव्वाच्या सुमारास परदेशी दारूचे बॉक्स घेऊन नंबर नसलेले ट्रॅक्टर भरधाव जात असताना ट्रॅक्टर उलटला. रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करत अतिवेगाने वाहन चालवून अपघात झाल्याने ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वाहन देवळा पोलिसांनी जमा केले असून, या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क मालेगाव विभाग यांचे अधिकारी वाय. एस. म्हस्के यांनी ट्रॅक्टरमधील परदेशी मद्य जप्त केले. मद्याचे बॉक्स व बाटल्या घेण्यासाठी तळीरामांनी गर्दी करत काही माल हातोहात लांबवला. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी