परप्रांतीय फिरू लागले माघारी! दिवसभर टेस्टिंग करून रेल्वेसह रात्री जाणाऱ्यांची गर्दी 

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनला तयार राहण्याबाबत संदेश दिल्यानंतर त्याचे बाजारपेठेवर परिणाम दिसू लागले आहेत. विशेषत: परप्रांतीय नागरिक पुन्हा त्यांच्या गावाकडे जाऊ लागले आहेत. 

परप्रांतीय फिरू लागले माघारी 
विशेष रेल्वेगाड्यांना सकाळपासून गर्दी वाढली असून, रात्री महामार्गावरून मिळेल त्या ट्रकने जाण्यासाठी द्वारका चौकात गर्दी वाढली आहे. द्वारका चाौकातून थेट परराज्यात जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल बससह ट्रक व इतर वाहने जातात. त्यासाठी द्वारका चौकात सायंकाळी सातपासूनच गर्दी वाढली आहे. विशेषतः लाॅकडाउनच्या काळात घरातील महिलांची गैरसोय होऊ नये, म्हणून महिला व मुलांना गावाकडे पाठविण्यासाठी रविवारी (ता. ४)पासून गर्दी सुरू झाली आहे.

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप

दिवसभर टेस्टिंग करून रेल्वेसह रात्री जाणाऱ्यांची गर्दी 

शनिवार व रविवार असे दोन दिवस शहर-जिल्ह्यात बंद असला, तरी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू आहेत. त्यात बस, मालवाहतूक वाहने सुरू असल्याने रेल्वेगाड्यांना गर्दी वाढत आहे. रात्री मालवाहतूक वाहनांच्या आश्रयाने लोक गावाकडे परतू लागले आहेत. मात्र त्यात कोरोना टेस्टिंग गरजेची असल्याने त्यासाठी दिवसभर परप्रांतीयांची गर्दी होती.  

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार