Site icon

परराज्यात झालेल्या नौसैनिक कॅम्पमध्ये नाशिकच्या युनिटची अभिमानास्पद कामगिरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्र छात्र सेना अर्थात एन.सी.सी. मध्ये नेव्हल एन.सी.सी. च्या अखिल भारतीय नौसैनिक कॅम्पला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यानुसार दि.2 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत विशाखापटणम, आंध्रप्रदेश येथील राज्यात ऑल इंडिया नौसैनिक कॅम्पचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र डायरेक्टरेटने तिसरा क्रमांक पटकावत गौरवास्पद कामगिरी बजावली आहे.

या ऑल इंडिया नौसैनिक कॅम्पचे उदघाट्न एअर कमोडोर मा. पी. माहेश्वर, व्ही. एम. डेप्युटी डायरेक्टर जनरल, एन.सी.सी आंध्रप्रदेश आणि तेलंगणा डायरेक्टरेट यांच्या हस्ते 3 ऑक्टोबरला झाला. पी. माहेश्वर यांनी सर्व कॅडेट्सचे या सर्वात्कृष्ट अशा ऑल इंडिया नौसैनिक कॅम्पसाठी निवड झाल्याबद्दल कौतुक केले. संपूर्ण भारतातून एकूण 17 डायरेक्टरेटमधुन 408 मुले (SD’s) व 204 मुली (SW’s) अशा एकूण 612 कॅडेट्सनी ऑल इंडिया नौसैनिक कॅम्पमध्ये बोट पुलिंग, शिप मॉडेलिंग, ड्रिल, सिमाफोर, सर्विस सब्जेक्ट, सीमानशिप प्रॅक्टिकल व फायरिंग अशा विविध स्पर्धामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. के. टी. एच. एम. महाविदयालयाच्या कॅडेट कॅप्टन सिद्धेश पाटील, पी.ओ. कॅडेट संस्कृती आहिरे, पी.ओ. कॅडेट आदित्य आहिरे, कॅडेट मानसी जाधव, कॅडेट वैभव गारे या पाच नेव्हल एन.सी.सी. कॅडेट्सची व  सब लेफ्टनंट डॉ. योगेश गांगुर्डे, नेव्हल एन.सी.सी ऑफिसर यांची कॉन्टिजन्ट कमांडर म्हणून या उल्लेखनीय व मानाच्या कॅम्पसाठी निवड झाली.

या कॅम्पमध्ये पी. ओ. कॅडेट संस्कृती आहिरे हिने नेमबाजीत , कॅडेट कॅप्टन सिद्धेश पाटील व कॅडेट वैभव गारे यांनी बोट पुलिंग मध्ये, कॅडेट मानसी जाधव हिने शिप मॉडेलिंग मध्ये तर पो. कॅडेट आदित्य अहीरे याने उत्कृष्ट कामगिरी केली. महाराष्ट्र काँटीजेन्टने सांघिक कामगिरीत सर्विस सब्जेक्टमध्ये प्रथम क्रमांक, सिमनशिपमध्ये दुसरा क्रमांक व बोट पुलिंगमध्ये दुसरा क्रमांक पटकावत कौतुकास्पद कामगिरी केली. या सर्वांना ग्रुप कमांडर मा. निलेश देखणे सर, कमांडिंग ऑफिसर कमांडर मा. कमल कुमार कुर्रा सर, पी.आय स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले. सन 2022 मध्ये  विशाखापटणम, आंध्रप्रदेश येथे झालेल्या ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प मध्ये नेव्हल एन.सी. सी. कॅडेटस च्या अथक मेहनतीमुळे महाराष्ट्र डायरेक्टरेटने संपूर्ण भारतातून तिसरा क्रमांक पटकावत अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल या सर्व यशस्वी कॅडेट्स चे मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस आदरणीय ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष मा. डॉ. सुनिल ढिकले, उपाध्यक्ष मा. विश्वास मोरे, सभापती मा. बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती मा. डी. बी. मोगल, चिटणीस मा. दिलीप दळवी, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षणाधिकारी डॉ. आर.डी. दरेकर, डॉ. नितिन जाधव, डॉ. भास्कर ढोके, डॉ. डी. डी. लोखंडे, डॉ. अजित मोरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही.बी. गायकवाड यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा:

The post परराज्यात झालेल्या नौसैनिक कॅम्पमध्ये नाशिकच्या युनिटची अभिमानास्पद कामगिरी appeared first on पुढारी.

Exit mobile version