परीक्षेशिवाय विद्यार्थी पास करण्याची वेळ; शिक्षकांची चिंता 

मुलवड (जि.नाशिक) : कोरोनामुळे शाळा बंद केल्या, तर ग्रामीण भागात ऑनलाइन शाळा सुरू असल्या तरी रेंजचा प्रश्‍न कायम असल्याने शाळा बंद आणि रेंजही बंद अशा स्थितीत परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना पास करण्याची वेळ आली. 

शाळा बंद, मोबाईलला रेंज नाही; शिकवणार कसे? 
राज्य सरकारने शाळांना सुट्या दिल्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद असला तरी शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनामुळे शाळा भरत नाही, शाळा भरत नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिकविता येत नाही, शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण देण्याचा नियम झाला असला, तरी ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईलला रेंज तर हवी... ग्रामीण आदिवासी दुर्गम भागात रेंजचे वांधे आहेत. अशा स्थितीत ग्रामीण भागात या पद्धतीवर अनेक मर्यादा आल्या. आदिवासी भागात तर सोडून द्या सगळीकडे रेंजची अडचण. तरीही शिक्षकांनी गावोगावी, पाड्यापाड्यावर जाऊन, मंदिरात, झाडाखाली, कुणाच्या तरी घराच्या पडवीत, एखाद्या झाडाखाली, विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. शाळेशिवाय शिक्षणाला पर्यायच नाही. हे लक्षात आले असले तरी वेळ खूप झाला आहे. मुलांना यंदा पास करावे लागणार ही शिक्षकांची चिंता आहे. 

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

‘कोरोनाची लस लवकर येणार आहे’ या बातमीने सर्वच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण शाळा आता लवकरच सुरू होणार आहेत हे त्यांना माहीत आहेच. त्यामुळे गुरुजी गावात दिसताच विद्यार्थी मोठ्या संख्येने गोळा होतात व आशेने विचारतात की, गुरुजी, कोरोनाची लस निघाली... आता शाळा कधी उघडणार? 

 हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न