पस्तीस हजार शेतकऱ्यांना मिळणार २० कोटींची भरपाई; शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याची कार्यवाही सुरू

येवला (जि.नाशिक) : यंदा पावसाने कृपा केली असली, तरी अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. येथील ३५ हजार शेतकऱ्यांच्या १६ हजार ८५७ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना सुमारे २० कोटींची भरपाई मिळणार असून, पहिल्या टप्प्यात तालुक्यासाठी राज्य शासनाकडून नऊ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. 

अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची कार्यवाही सुरू
जुलै ते ऑक्टोबर २०२० दरम्यान येवला तालुक्यात सुमारे ५०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला होता. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये धुमाकूळ घातलेल्या परतीच्या, तसेच अवकाळी पावसाने तालुक्यातील तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांच्या १६ हजार ८५७ हेक्टरवरील पिकांची नासधूस केली आहे. यात ३३ टक्‍क्‍यांच्यावर झालेल्या या नुकसानीचे पंचनामे करून अहवालानुसार सुमारे २० कोटी १२ लाख रुपयांचे नुकसान तालुक्यातील शेतकऱ्यांना सहन करावे लागले आहे. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

तब्बल दोन कोटी ६७ लाख रुपयांचा फटका
तालुक्यात बाजरीचे २.१०, तर मक्याचे सर्वाधिक दोन हजार ३२८ हेक्टर, कापसाचे एक हजार ४९१ हेक्टर, भुईमुगाचे ३.७ हेक्‍टर, तर सोयाबीनचे ११२ हेक्‍टरवर असे जिरायती पिकाखालील तीन हजार ९३६ हेक्टरवर नुकसान झाले असून, याचा फटका आठ हजार ३६० शेतकऱ्यांना तब्बल दोन कोटी ६७ लाख रुपयांना फटका बसला आहे. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

२० कोटींच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे
कांदा पिकाबाबत २६ हजार ६४४ शेतकऱ्यांचे तब्बल १२ हजार ९४१ हेक्‍टरवर कांद्याचे व दोन हेक्टर भाजीपाल्याचे नुकसान होऊन १७ कोटी ४३ लाख रुपयांना फटका बसला आहे. फळपिकामध्ये ॲपल बोरचे २.४०, तर द्राक्षाचे १.८० असे ४.२० हेक्‍टरवरील चार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या अहवालात बागायती कांदा व भाजीपाल्यासाठी हेक्‍टरी १३ हजार ५००, फळपिकांसाठी १८ हजार, तर जिरायती पिकासाठी सहा हजार ८०० रुपये दराने मदतीचा हा अहवाल बनविला गेला. अहवालानुसार नुकसानीची एकूण आकडेवारी २० कोटींच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यातील नऊ कोटी २० लाख ६५ हजार इतका निधी पहिल्या टप्प्यात प्राप्त झाला आहे. 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरित करण्याचे काम सुरू झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील निधी प्राप्त झाल्यावर उर्वरित गावातील शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप होणार आहे. -प्रमोद हिले, तहसीलदार, येवला 